अकोला – जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीत एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली असून या विद्यार्थ्याचा शोध अद्याप आपत्कालीन पथकाकडून सुरु आहे.नदी पात्रात उडी मारलेल्या तरुणाचे नाव अक्षय गजानन ताथोड असे आहे. तो अकोल्यातील विश्वकर्मा नगर मोठी उमरी येथे राहतो.
नदीच उडी घेताना अक्षयने आपल्या दुचाकीसह इतर साहित्य पुलावर ठेवले आणि काही कळायच्या आत त्याने उडी मारली.दरम्यान,काल घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच अक्षयला शोधण्यासाठी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते.मात्र,रात्रीची वेळ असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे.नदीपात्रात उडी घेणारा तरुण खाजगी इलेक्ट्रिशीयन असुन तो होतकरु व मेहनती असून त्याला दोन बहिणी असल्याची माहिती मिळाली आहे.शिवाय हा तरुण पुर्णा नदीच्या परीसरात कुठे आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.