संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

पूंछमध्ये जवानांचा एकमेकांवर गोळीबार; २ ठार, २ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पूंछ – आपले जवान सीमेवर रात्रंदिवस कर्यरत असतात म्हणून आपण आपापल्या घरात सुखाने जगू शकतो, असेच आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो आहोत. मात्र आज जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. पूंछच्या सुरनकोटमध्ये सीमेची सुरक्षा सांभाळणाऱ्या लष्कराच्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या जवानांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर दोन जवान जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.
मिळालेल्या माहितीनुसार, 156 टेरिटोरियल बटालियनचे हे जवान सकाळी सहा वाजता परेड करणार होते, मात्र त्याआधी साडे पाचच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादाचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु यापूर्वीही त्यांच्यामध्ये काही गोष्टींवरून वाद झाला होता. आज सकाळी परेडसाठी देण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर करून त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून बटालियनमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. इतर सैनिक आणि अधिकारी तातडीने तिथे पोहोचले तेव्हा काही सैनिक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. या सर्वांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर इतर दोन जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हेलिकॉप्टरमधून उधमपूरच्या आर्मी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, शहीद झालेल्या दोन जवानांपैकी एकाचे नाव शिपाई अबरार अहमद असे होते. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते, तर दुसऱ्या जवानाचा रुग्णालयात पोहोचताच मृत्यू झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami