संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

‘पॅडमॅन’ चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराला ईडीकडून अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. ‘क्रिअर्ज इंटरटेन्मेंट’ ही प्रेरणाची निर्मिती संस्था असून या बॅनरअंतर्गत तिने काही प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याआधीही प्रेरणावर आर्थिक फसवणुकीचे बरेच आरोप करण्यात आले होते.

मागचे 8 महिने प्रेरणा अरोरा मनी लाँड्रिगप्रकरणी तुरुंगात होती. काही दिवसांआधीच ती जामिनावर बाहेर आली होती. प्रेरणा, प्रोडक्शन हाऊस क्रिअर्ज इंटरटेन्मेट प्रायव्हेट लिमिटेडची डायरेक्टर प्रोतिमा आणि प्रमोटर अर्जुन कपूर यांना 3.16 करोड रुपयांच्या फसवणूकीच्या केसमध्ये 2018 साली अटक करण्यात आली होती. वर्षभरानंतर 2019 मध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी निर्माता वाशु भगनानीकडून पॅडमॅन आणि केदारनाथ या चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसे उधार घेतले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही त्यांनी ते पैसे परत केले नाहीत. वासु भगनानी आणि त्यांच्या प्रोडक्शन कंपनीने प्रेरणाविरोधात नोटीसही जारी केली होती. ज्यात प्रेरणाची आई आणि क्रिअर्ज इंटरटेन्मेटच्या पार्टनरच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami