संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

पॅरिसच्या बारमध्ये गोळीबार; १ ठार, ४ जखमी, हल्लेखोर ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पॅरिस – अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनांबाबत जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत असतानाच सोमवारी रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून गोळीबाराची घटना समोर आली. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला त्याब्यात घेतले आहे, मात्र गोळीबार का केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ही घटना प्रसिद्ध प्लेस दे ला बॅस्टिलजवळ शिशा कॅफे येथे घडली. स्थानिक महापौर फ्रँकोइस वोगलिन यांनी याबाबत माहिती दिली.

तसेच ईशान्य पॅरिस स्थानिक सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.३५ वाजता एका कारमधून दोन पुरुष उतरले. त्यांनी बारच्या गच्चीवर बसलेल्या लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. या गोळीबारात पाचजण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर चौघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहे. हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र दुसरा हल्लेखोर पळाला, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, घटनास्थळावरील फुटेज समोर आले असून त्यात डॉक्टर आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी स्ट्रेचर व इतर आपत्कालीन मदत वाहनांसह घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये, रस्त्यावर अनेक रुग्णवाहिका उभ्या असून पोलीस नाकाबंदी करताना दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami