मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7,231 पोलीस शिपाई पदाच्या भरतीला मंजुरी देण्यात आली. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी 50 गुणांची असणार आहे. त्यामुळे पोलीस उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे (20 गुण) 100 मीटर धावणे (15 गुण), गोळा फेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील. तसेच राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे (50 गुण), 100 मिटर धावणे (25 गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहीरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 याप्रमाणे 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी प्राप्त असतील.