संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

प्रकाश आंबेडकरांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अकोला – सध्या देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी दिली आहे. एनडीए द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मुर्मू यांना आपला पाठिंबा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज ट्विट केले आहे की, यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती करत आहे कारण, अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी इच्छूक आहेत. असे ट्वीट त्यांनी केले आहे.शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती आपचे खासदार संजय सिंग यांनी दिली आहे.

झारखंड मध्ये हेमंत सोरेन आणि काँग्रेस दोघे एकत्रित सरकारमध्ये आहेत. पण झारखंड हा आदिवासी बहुल प्रदेश त्यात हेमंत सोरन यांचा पक्ष याच वर्गाचं प्रतिनिधीत्व करणारे आहे. त्यामुळे यशवंत सिन्हा हे झारखंडचे असूनही सोरेन यांनी मात्र आदिवासी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिला आहे.राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या १८ जुलैला होणार असून २१ जुलैला मतमोजणी आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami