संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता: प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी ही माहिती दिली. बाळकृष्ण दास पुरस्कार प्राप्त मिश्रा या दीर्घकाळापासून वयोमानानुसार होणाऱ्या संबंधित आजारांशी झुंज देत होत्या. दक्षिण कोलकाता इथल्या चेतला परिसरातील त्यांच्या राहत्या घरी निर्मला यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२.०५ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.निर्मला यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रविवारी सकाळी ११ च्या सुमारास रवींद्र सदन याठिकाणी नेण्यात आले. बंगाली कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्मला मिश्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात १९३८ मध्ये जन्मलेल्या निर्मला यांना संगीत सुधाकर बाळकृष्ण दास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उडिया संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. निर्मला यांनी अनेक बंगाली आणि ओडिया चित्रपटांमधील गाणी गायली होती. निर्मला मिश्रा यांच्या लोकप्रिय बंगाली गाण्यांमध्ये ‘इमोन एकता झिनुक’, ‘बोलो तो अर्शी’ आणि ‘ई बांग्लार माटी चाय’ यांचा समावेश आहे. तर ‘निदा भरा राती मधु झारा जान्हा’ आणि ‘मो मन बिना रा तारे’ ही त्यांची ओडिया भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami