नवी दिल्ली- गुजरातमधील एका समूहावर २० जुलै २०२२ ला प्राप्तिकर विभागाने छापे घातले. खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद आणि कोलकत्तासह समूहाच्या देशभरातील ५८ ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. त्यात १,००० कोटींचा ‘ब्लॅक मनी’ सापडला, अशी माहिती सीबीडीटीने दिली.
आयकर विभागाने घातलेल्या छाप्यांमध्ये २४ कोटी रोख व दागिने, सुमारे २० कोटींच्या मौल्यवान वस्तू सापडल्या. २० जुलैला आयकर विभागाने ५८ ठिकाणी छापे घातले त्यात काळ्या पैशांचे हे घबाड सापडले. दुसऱ्या घटनेत ईडीने ३,९८६ कोटींच्या बँक कर्ज गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रीग प्रकरणी चेन्नईतील सुराणा समूहावर छापे घातले. त्यात ५१ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या ६७ पवनचक्क्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.