मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांना केवळ ११ लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे.असे म्हणत खासदार जया बच्चन यांनी ईडीच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.राऊतांच्या अटकेमुळे राज्याची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना केवळ ११ लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे, शिवाय हे सर्व २०२४ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.
जया बच्चन यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना राऊतांना ईडीने केलेल्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. राऊतांची अटक हा ईडीचा दुरुपयोग असल्याचे तुम्हाला वाटते का?यावर त्या म्हणाल्या, ‘ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात.तसेच संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे,तसेच ईडी हे सर्व प्रकार २०२४ पर्यंत चालणार असल्याचेही जया बच्चन यांनी म्हटले आहे.