संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

फडणवीस-राज ठाकरे भेट; ‘शिवतीर्थ’वर राजकीय खलबते

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्र लिहून फडणवींसाचे जाहीर कौतुक केले होते. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी आज त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थवर भेट दिली. याठिकाणी दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. परंतु या भेटीतून काही नवीन राजकीय समीकरणे निर्माण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजपामध्ये जवळीक वाढली आहे. मशिदीवरील भोंगा प्रकरण मनसेने उचलून धरले होते. फडणवीस आणि राज यांनी अनेक सभांमधून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यामुळेच येऊ घातल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची आजची भेट म्हणजे राज्यातील नव्या सत्ता समीकरणाची नांदी ठरू शकते, असे म्हटले जात आहे.

यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेला जर भाजपा आणि शिंदे गटाची साथ मिळाली तर शिवसेनेसाठी महानगरपालिकेची सत्ता टिकवून ठेवणे अवघड होईल. त्यामुळे या भेटीचे महत्त्व राजकीय वर्तुळात खूप वाढले आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी गणेश यज्ञ केले होते. या यज्ञपूजनासाठी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami