मुंबई – बॉलिवूडचं स्टार कपल सैफ-करीना सध्या लंडनमध्ये सहकुटुंब सहपरिवार सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांचे लंडनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु त्यापैकी एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जो पाहून करीना तिसऱ्यांदा गरोदर आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करीनाने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला असून तिच्या हातात स्लिंग बॅग दिसत आहे. नो मेकअप लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. परंतु तरीही लोकांच्या नजरा मात्र तिच्या पोटावर खिळल्या आहेत. चाहते तिच्या पोटाला ‘बेबी बंप’ म्हणत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर करीना तिसऱ्यांदा आई होणार आहे, असे थेट जाहीर करून टाकले आहे. तर, काहींचे म्हणणे आहे की, हा फोटो जुना आहे. तसेच अनेकांनी करीना पुन्हा गरोदर आहे का, असा प्रश्न विचारला आहे. मात्र आता यावर जोपर्यंत करीनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत याबाबत काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्यामुळे आता सर्वांना करीनाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, मध्यंतरी एका मुलाखतीत करीना म्हणाली होती की, तिचा नवरा सैफ आली खान वयाच्या प्रत्येक दहा वर्षांच्या टप्प्यात बाप झाला आहे. म्हणजे तो विशीत असताना त्याला मुलगा झाला, मग तिशीत, मग चाळीशीत त्यामुळे आता साठीकडे जाताना तरी मी त्याला बाप होऊ देणार नाही, असे तिने सांगितले होते. परंतु आता करीना-सैफ त्यांच्या तिसऱ्या बाळाला जन्म जेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
