बारामती – बँक ऑफ महाराष्ट्रच्या 42 खातेदारांनी जवळपास 10 हजार 929 कोटी रुपयांची कर्ज निलेखित केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणात खासदार सुप्रिया सुळेंनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याची विनंती केली आहे.
बँकेच्या थकबाकी असणार्या कर्जदारांची यादी वृतपत्रातून प्रसिद्ध केली जाते. मात्र या 42 बंड्या थकबाकीदारांवर ही मेहरबानी कशासाठी केली जात आहे. असा प्रश्न आता सामान्य लोकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी देखील या प्रकरणाची दखल घेत आता थेट अर्थमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.