मुंबई -एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार जोरदार प्रयत्न करीत आहेत. बंडखोर परतल्यावर त्यांच्या भूमिकेत नक्की बदल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण दिल्लीला आलो आहोत असे जरी ते सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठीच त्यांची हि दिल्ली वारी होती हे स्पष्ट झाले आहे. कारण दिल्लीत त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील प्रश्नांवरच अधिक चर्चा झाली या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि आम्ही काही झाले तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही . बंडखोराना परिवर्तन हवे होते . पण त्यांचे बंद यशस्वी होणार नाही मुंबईत आल्यावर त्यांची भूमिका बदलेल . बंडखोर म्हणतात कि आमच्याकडे संख्याबळ आहे मग तसे असेल तर मुंबईत येऊन ते बहुमत का सिद्ध करीत नाहीत . असा सवालही त्यांनी केला. या बंडामागे भाजपचा हात आहे हे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे बंडखोरांनी मागणी करताच केंद्राने त्यांना सुरक्षा दिली असेही पवारांनी सांगितले तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली .राष्ट्रवादीवरील बंडखोरांच्या आरोपांबद्दल बोलताना ते केवळ निमित्त आहे असे त्यांनी सांगितले.