संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

बदलापूरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण! वयोवृद्ध डॉक्टरला झाली लागण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बदलापूर – बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यानंतर बदलापूर पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.दरम्यान, डोंबिवलीसह मिरा-भाईंदरमध्ये देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रसार वाढू लागला आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बदलापुरातील एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली असून परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे ही लागण झाल्याचे सांगितले जात आहे.
स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य विभागाने ट्रेसिंग सुरू केले आहे. बदलापूर शहर हे मुंबईजवळील सॅटेलाईट शहारांपैकी एक समजले जाते.कारण या शहरात मुंबई आणि नवी मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी सर्वाधिक संख्येने वास्तव्याला आहेत. कोरोना काळात बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami