कोलकाता – बंगाली चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजूमदार यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. मजूमदार हे कोलकाता एका सरकारी रुग्णालयात उपचार घेते होते. मागील अनेक दिवसांपासून ते किडनी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावरती कोलकातामधील सेठ सुखल करनानी मैमोरिय़ल रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
तरुण मजुमदार यांनी अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. बंगाली मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या आकर्षक कथांचा वापर त्यांनी आपल्या चित्रपटात केल्या.
मजूमदार यांनी ‘बालिका वधू’, श्रीमान पृथ्वीराज’, ‘कुहेली’ ‘आपन अमार आपन’ यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. १९९० साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते. त्यांच्या जाण्यामुळे बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.