संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

बिल गेट्सना मागे टाकत फोर्ब्सच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आले आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथ्या स्थानावर स्थान मिळविले आहे.

दरम्यान, बिल गेट्स यांनी घोषणा केली होती की, ते त्यांच्या संपत्तीतून $ २० अब्ज दान करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ते श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानावरून पाचव्या स्थानावर आले आहेत. तर गौतम अदानी ११४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. तसेच त्यांच्यापुढे पहिल्या तीन स्थानांवर असलेल्या लोकांमध्ये टेस्लाचे एलन मस्क यांचा समावेश आहे, जे $ २३० अब्ज संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत, तर लुई व्हिटॉनचे बर्नार्ड ऑरनॉल्ट दुसऱ्या स्थानावर आणि ऍमेझॉनचे जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ८८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १०व्या स्थानावर आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami