मुंबई – मुंबईतील लालबाग परिसरातील गणेश गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मुंबईचा राजा’ गणेशाचा पाद्यपूजन सोहळा बुधवार, १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गणेश मैदान, गणेश गल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यंदा ‘मुंबईचा राजा’ सार्वजनीक गणेश मंडळाचे ९५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. बुधवारी सायंकाळी ४ वाजता पाद्यपूजन मुहूर्त सुरू झाल्यानंतर मुंबईच्या राजाचरणी पहिली वादक मानवंदना, मुंबईच्या राजावर आधारित नवीन अधिकृत गाण्याचे प्रक्षेपण, दुसरी वादक मानवंदना, अधिकृत टी-शर्ट अनावरण, तिसरी वादक मानवंदना आणि पाद्यपूजन समारोप पार पडणार आहे.