संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

बेस्टच्या कंत्राट कामगारांचा पुन्हा संप! प्रवाशांचे हाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : वडाळा आगारामधील भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या कंत्राटी चालकांनी रविवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एप्रिल महिन्यापासून वेळेवर वेतन न मिळल्यामुळे वडाळा आगारामधील बेस्टचे कंत्राटी चालक पुन्हा एकदा संपावर गेले. वडाळा आगरातच सोमवारी ६३ बसगाड्या खोळंबल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने स्वमालकीच्या २७ बसगाड्या सोडल्या होत्या. चालकांनी सोमवारीही आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे बेस्ट प्रशासनाने सदर कंत्राटदाराला या बाबतीत तातडीने लक्ष घालून त्वरित तोडगा काढण्यासाठी सांगितले आहे. दरम्यान,दर दोन-तीन महिन्यांनी संपामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
वडाळा आगारात एम. पी. ग्रुपतर्फे भाडेतत्वावर बसचा पुरवठा करण्यात आला असून या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी चालक त्या चालवित आहेत. वेळेवर वेतन मिळावे आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा व्हावी या मागणीसाठी कंत्राटी चालकांनी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ‘काम बंद’ आंदोलन केले आहे. वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या नियोजित ६३ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाही. बेस्टच्या कंत्राट कामगारांच्या ह्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.याशिवाय आज वडाळा रेल्वे स्थानक येथून सुटणाऱ्या हिदुस्थान कंपनी, गांधीनगर, गोदरेज कॉलनी, कन्नमवार नगरसह वडाळातील काही मार्गांवर प्रवाशांना बस वेळेत उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

दरम्यान,बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्या उपलब्ध केल्या असून त्या विविध मार्गांवर चालविण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील बसगाडीवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चालकांना वेळेवर वेतन मिळाले नसल्यामुळे बस चालक वारंवार संपावर जात आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami