मुंबई – बोरिवलीत असलेल्या धीरज सवेरा इमारतीला आग लागल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. या आगीतून ११ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट केले नाही.
बोरिवलीत धीरज सवेरा इमारतीच्या १४व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आग लागली होती. त्यामुळे त्यातील घाबरलेल्या रहिवाशांनी स्वत:ला वाचवण्यासाठी १५व्या मजल्यावर धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या, आठ जम्बो टँकर, रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागलेल्या फ्लॅटमधील तीन महिला आणि इतर आठ जण अडकले होते. त्यांना या फ्लॅटमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सकाळी 6.30 वाजता या आगीवर नियंत्रण मिळवले.