संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

भरमसाट शुल्कावरुन विद्यापीठ बंदचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाट वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसदर्भात सलग दुसर्‍या दिवशीही भर पावसात विद्याथ्यार्र्ंचे बेमुदत घंटानाद आंदोलन सुरुच होते. या सर्व आंदोलक विद्याथ्यार्र्ंनी विद्यापीठ परिसरात शुल्कवाढ जनजागृती रॅली काढत विद्यापीठ बंदचा इशारा दिला आहे. आंदोलक विद्याथ्यार्र्ंनी विद्यापीठ आवारात शुल्कवाढ जनजागृती रॅली काढली. यात सर्व विभाग, ग्रंथालय, भोजनालय, मुलांचे-मुलींचे वसतीगृह आदींना भेट दिल्या. रॅलीदरम्यान आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी विद्याथ्यार्र्ंची भेट घेत संवाद साधला. ही लढाई योग्य असून या आंदोलनाला माझा संपुर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुलगुरुंची भेट घेऊन यावर यावर लवकरच तोडगा काढायला सांगू आणि यावर मार्ग काढला नाही तर माझ्यासह संपूर्ण आझाद समाज पार्टी या आंदोलनात सहभागी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami