संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे! प्रफुल्ल पटेलांसाठी कार्यकर्त्यांचे भावनिक पोस्टर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भंडारा – राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात प्रफुल्ल पटेल यांना धीर देणारे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांनी ‘हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे’, असे पोस्टर लावून त्यांना धीर दिला आहे.

प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पटेल यांचे समर्थक दुखावले गेले. आता पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना भावनिक साद देत समर्थन दिले आहे. दरम्यान, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील व्यवहारासंदर्भात ईडीने ही कारवाई केली. वरळी येथे सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीजे हाऊसमधील दुसऱ्या मजल्यावर ईडीने आधीच कारवाई केली होती. तर, आता काही दिवसांपूर्वी चौथ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami