संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

भाजपचे बडतर्फ सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेचा आणि भाजपचे सोलापूरचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार
भाजपचे सोलापूर येथील बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि पीडित महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकारानंतर खळबळ उडाली होती. देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणात आता पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली या ठिकाणच्या हॉटेलमध्ये प्रकार घडला असल्याने पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami