संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

भाजपाकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले गेले आहे. भाजपाने यावेळी विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे.

राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही त्यांना उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी याबाबत बोलताना सांगितले, ‘पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल. पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही. परंतु भाजपामधील नाराजी ही पाण्यातील एखादं जहाज क्रेनने उचललं तर पाण्यात पडणारा जो खड्डा असतो, तसाच लगेच भरला जाणारा असतो. त्यामुळे नाराजी ही तात्कालिक असते’, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami