मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या मतदानासाठी पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असून रुग्णवाहिकेतून मतदानासाठी हजर झाले.
लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेची हजर झाले. त्यांच्यासोबत डॉक्टरांची टीमदेखील होती. जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले. तर, मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना मतदानास हजर राहिल्या.