जयपूर- राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल आमदार शोभाराणी कुशवाह यांची भारतीय जनता पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली. त्या राजस्थानातील ढोलपूर मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
त्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यानंतर पक्षाने आज त्यांच्यावर मोठी कारवाई केली. भाजपाचे केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी आमदार शोभाराणी कुशवाह यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. पत्रात शोभाराणी कुशवाह यांना उद्देशून म्हटलं आहे की, तुम्हाला पक्षातून तत्काळ निष्कासित करण्यात येत आहे. तसेच पक्षाने दिलेल्या इतर जबाबदार्यांमधूनही मुक्त करण्यात येत आहे. शोभाराणी कुशवाह यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यात येणार असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.