संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

भाजीपाल्याला पुराचा फटका; श्रावण सुरू होण्याआधीच भाववाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – अतिवृष्टीमुळे विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचा भाजीपाला पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सततच्या पावसामुळे काही शेतांमधील भाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक विक्रमी कमी झाली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. श्रावण महिना सुरू होण्याआधीच भाववाढ झाल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे.

वांगे, फुलकोबी, कोथिंबीर, शिमला मिरची, ढेमस, कैरीचे भाव ठोक बाजारात ५० ते ६० रुपये किलो झाले आहेत. तर, घाऊक बाजारात सर्वच भाज्यांचे भाव आता प्रतिकिलो ८० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, खापरखुटी, तरोटा, अंबाडी, तांदळाची भाजी, इत्यादी भाज्या फक्त पावसाळ्यात मिळत असल्याने त्यांना सध्या ग्राहकांची पसंती मिळत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami