संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

भारतात सर्वांत आधी मुंबईसह १३ शहरांत ५ जी स्पेक्ट्रम सेवा मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली -५ जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया संपली असून ५ जी सेवा भारतात सर्वात प्रथम मुंबईसह १३ शहरामध्ये सुरू होणार आहे. याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, स्पेक्ट्रम वाटपाचे काम येत्या १० दिवसांत पूर्ण केले जाईल. त्यानंतर ऑक्टोबरपासून देशात ५ जी सेवा सुरू करता येईल.
दूरसंचार विभागाच्या अहवालानुसार, भारतात प्रथम १३ शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली जाईल.ज्या शहरांमध्ये लोकांना प्रथम ५ जी कनेक्टिव्हिटी मिळेल. या शहरांमध्ये मुंबईसह अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता,लखनऊ आणि पुणे यांचा समावेश आहे. जिओकडून असा दावा केला जात आहे की, ते देशात प्रथम ५ जी सेवा सुरू करू शकतात. मात्र, एअरटेल या बाबतीत मागे राहणार नाही. खरं तर, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्यांचे ५ जी नेटवर्क पूर्णपणे तयार आहेत.यासोबतच तिन्ही कंपन्यांनी ५ जी चाचण्या देखील पूर्ण केल्या आहेत. ५ जी सेवा भारतात सर्वात स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येईल असा दावा जिओ कडून करण्यात येत आहे.तसेच, केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही ५ जी ही सेवा स्वस्त दरात सुरू होऊ शकते असे सांगितले. महत्वाचे म्हणजे, ५ जी सेवेचा स्पीड ४ जी पेक्षा १० पट जास्त असणार असल्याचे सांगितले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami