संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत – शक्तिकांत दास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणारी घसरण चिंताजनक आहे, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था गंभीर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, असा दावा केला आहे. बॅंक ऑफ बडोदाकडून वार्षिक बॅंकिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले असून परिषदेचे उद्घाटन करताना ‘बॅंकिंग क्षेत्राचे भविष्य आणि आव्हाने’ या विषयावर दास यांनी भाष्य केले.

असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज असल्याचे दास यांनी यावेळी म्हटले. तसेच आरबीआय रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत असून आरबीआयच्या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वाढत्या तेलाच्या किंमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे सध्या महागाईत वाढ होत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयातीतील महागाईमुळे देशातही महागाई वाढतेय. त्यामुळे या मुद्याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. पुढील पतधोरण बैठकीत आम्ही महागाई दरात बदल करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रुपया कुठपर्यंत खाली येईल हे सध्या सांगू शकत नाही, मात्र रुपयाच्या दरातील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे दास यांनी म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami