संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

भारतीय गुंतवणूकदार सोन्याकडे वळले देशातील सोने खरेदीत ४३ टक्के वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत ८ टक्के घट झाली असताना भारतात मात्र सोने खरेदीत ४३ टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या उलाढालीत जूनच्या तिमाहीत ५४ टक्के वाढ झाली. या तिमाहीत ७९ हजार २७० कोटींची सोने खरेदी झाली. २०२१ मध्ये याच तिमाहीत ५१ हजार ५४० कोटींची सोने खरेदी झाली होती, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने अहवाला दिली आहे.
यंदा जागतिक स्तरावर सोने खरेदीत ८ टक्के घट झाली आहे. असे असताना भारतात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याच्या मागणीत ४३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणे बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण, वाढती महागाई आणि सरकारची धोरणे याला कारणीभूत असू शकतात. एप्रिल ते जून या काळात भारतात सोन्याची मागणी १७०.७ टन होती. २०२१ मध्ये याच काळात सोन्याची मागणी ११९.६ टन होती. म्हणजे २०२१ च्या तुलनेत भारतातील सोने खरेदीत यंदा ४३ टक्के वाढ झाली, असे सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. या तिमाहीत भारतात ७९ हजार २७० कोटींची सोने खरेदी झाली. गेल्यावर्षी ती ५१ हजार ५४० कोटी होती. जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी ८ टक्क्यांनी घटल्याने ९४८.४ टन सोने खरेदी झाली. २०२१ च्या तिमाहीत ती १,०३१.८ टन होती, असे अहवालात नमूद केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami