संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. सोमवारी झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या फेरीत त्यांना एकूण ११५ मते मिळाली. त्यामुळे तेच ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असतील, अशी चर्चा जगभरात सध्या सुरू आहे. दरम्यान, ब्रिटन पंतप्रधान निवडणुकीची चौथी फेरी आज, मंगळवारी पार पडणार होती, परंतु संध्याकाळपर्यंत तिचा तपशील समोर आला नाही.

तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर ऋषी सुनक म्हणाले, ‘आपण एकत्रितपणे आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारू शकतो. तसेच ब्रेक्झिट वाचवू शकतो.’ ऋषी सुनक यांच्यासह पेनी मॉर्डेंट, लिझ ट्रस आणि केमी बॅडेनोक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे तीन उमेदवार या निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीतून चौथ्या फेरीत दाखल झाले. तर, तिसऱ्या फेरीत कमी मते मिळाल्याने टॉम तुगेंधत या शर्यतीतून बाहेर पडले. आता चौथ्या फेरीतून केवळ दोन उमेदवार रिंगणात राहणार असून ५ सप्टेंबरपर्यंत विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेईल. जर या निवडणूकीत ऋषी सुनक हे पंतप्रधान झाले तर भारतासाठी ही अभिमानाची बाब असेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami