भिवंडीमध्ये घराचा भाग कोसळला

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

भिवंडी- भिवंडी शहरातील आजमी नगर टिपू सुलतान चौक येथे एक मजली घराचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यानंतर नागरिकांना स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटना घडल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.

Close Bitnami banner
Bitnami