पुणे – ज्यांनी २५ वर्षे संस्थेचा पारदर्शक कारभार केला. संस्था वाढवली. ठेवीदारांचा विश्वास मिळवला ते गिरीश समदडिया संचालक मंडळात नसल्यामुळे नाराज झालेल्या मंचर येथील श्री साईनाथ नागरी सहकारी संस्थेच्या ११ पैकी ७ संचालकांनी राजीनामे दिले. त्यामुळे संस्थेत वेगळाच पेच निर्माण झाला आहे.
साईनाथ नागरी सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गिरीश समदडिया यांनी २५ वर्षांपासून पारदर्शक कारभार केला. सभासद, कर्जदार आणि ठेवीदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे या संस्थेची एकदाही निवडणूक झाली नाही. मात्र ज्यांचा या पतसंस्थेची संबंध नाही. ज्यांनी संस्थेसाठी काही केले नाही. ते या संस्थेत आल्यामुळे नाराज झालेल्या ७ संचालकांनी दोन दिवसांत राजीनामे दिले. यामुळे संस्थेतील नाराजी उघड झाली.