संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

मंदिरात जाण्यासाठी धर्माचे बंधन असू शकत नाही!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मद्रास – कोणत्याही धर्माच्या व्यक्तीची हिंदू धर्माच्या एखाद्या देवतेवर श्रद्धा असेल आणि ती व्यक्ती त्या देवतेचे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छित असेल तर त्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही. कारण मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही धर्माचे बंधन असू शकत नाही,असे मत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी व्यक्त केले.तसेच ही याचिकाही फेटाळून लावली.

तिरूवत्तर येथील अरुलमिघू आदिकेसवा पेरूमल तिरूकोविलच्या कुंबाबिशेगम उत्सवामध्ये हिंदू नसलेल्या व्यक्तींना सहभागी होण्यास परवानगी देवू नये,असे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका सी सोमण नावाच्या नागरिकाने मद्रास उच्च न्यायालयात केली होती.या उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जन्मताच ख्रिश्चन धर्मातील असलेल डॉ.केजे येसुदास यांचे नाव आहे. त्यांनी गायलेली अनेक भक्तिगीते हिंदू मंदिरांमध्ये वाजवली जातात. तरीही ते बिगर हिंदू धर्मीय असल्याने त्यांना कुंभबिशेगम या हिंदूंच्या उत्सवामध्ये सहभागी करून घेण्यास परवानगी देवू असे याचिकेत म्हटले होते. मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की,एखादी बिगर हिंदू व्यक्ती हिंदू देवतेवर श्रद्धा दाखवत असेल तर त्याच्या दर्शनासाठी त्याला मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही.तसेच हा सार्वजनिक उत्सव असल्याने मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रत्येक भक्ताच्या धर्माची सत्यता पडताळणे संबंधित यंत्रणेला ते शक्य होणार नाही , असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने सी सोमण यांची याचिका फेटाळून लावली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami