संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

मच्छिमारांना सापडला शापित मासा
भयानक संकटाचे संकेत असल्याची चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सॅंटियागो – जगात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. काही प्राणी पौराणिक देखील मानले जातात. तुम्ही त्यांच्याबद्दल अनेक कथांमध्ये वाचले असेल. पण खऱ्या आयुष्यात क्वचितच कोणी पाहिले असेल.चिलीमध्ये राहणाऱ्या काही मच्छिमारांच्या जाळ्यात असाच एक मासा आढळला आहे. हा मासा चित्रपटात दाखवलेल्या शापित माशासारखा दिसतो. अशा स्थितीत आता हा समुद्री जीव भेटणे म्हणजे काहीतरी अशुभ होण्याचे संकेत असल्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे. या विचित्र मास्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहे.
जेव्हा मच्छिमारांचा एक समूह मासेमारी करून घरी पोहोचला तेव्हा त्यांना १६ फूट लांबीचा एक समुद्री जीव आढळला ज्याची त्यांनी शिकार केली होती. स्थानिक लोकांना हा मासा पाहून धक्का बसला आणि त्यांनी याला ‘अशुभ’ संकेत म्हणायला सुरुवात केली. टिकटॉकवर या माशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हा मासा ‘किंग ऑफ द हेरिंग्स’ म्हणून ओळखला जातो.त्याची लांबी पाच मीटरपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १६ फूट आहे. हा अत्यंत दुर्मिळ मासा आहे. असे म्हणतात की हे मासे भविष्य सांगतात. जर हा मासा दिसला म्हणजे एक मोठी घटना घडू शकते असे काही लोकांचे म्हणणे आहे. याआधी हा मासा २०११ मध्ये जपानमध्ये दिसला होता.त्यानंतर फुकुशिमामध्ये भीषण भूकंप झाला.आता पुन्हा एकदा हा मासा दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami