संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

मनालीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिमला – हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. किन्नौरपासून ऊनापर्यंत सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या मनालीत तर पावसाने प्रचंड जोर धरला. मंगळवारी अवघ्या ३० मिनिटांच्या मुसळधार पावसाने मनाली शहर जलमय झाले.

तेथील रहिवाशांनी सांगितले, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की मॉल रोड आणि पोलीस स्टेशनचा रस्ता नाल्यांसारखा दिसत होता. अनेक रस्ते जलमय झाले होते. तसेच मनालीलगतच्या भजोगी आणि सियाल या नाल्यांचे पाणीही वाढले. काही हॉटेल, घरे, दुकाने, कार्यालये आणि बसस्थानकातही पावसाचे पाणी शिरले. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे दगड, माती रस्त्यांवर आली होती, त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊ नयेत यासाठी मनाली शहराचे प्रवेशद्वार काही काळासाठी बंद करण्यात आले होते. परंतु वनविहार रस्त्यालगत झाडाची फांदी वाहनावर पडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, लोकांनी सावध राहावे, नदी-नाल्यांजवळ जाऊ नये, प्रशासन हवामान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशा सूचना सरकारकडून तेथील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami