हैदराबाद- मनीलाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मोठी कारवाई केली. कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड, कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी. पार्थसारथी आणि इतरांची ११० कोटींची मालमत्ता जप्त केली.
ग्राहकांचे शेअर्स बेकायदा गहाण ठेवून कार्वी समूहाने सुमारे २,८०० कोटींची कर्जे मिळवली होती. या प्रकरणी कर्ज देणाऱ्या बँकांनी केलेल्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी कार्वी समूहाविरोधात मनीलॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड, सीएमडी पार्थसारथी आणि इतरांविरुद्ध कारवाई करून त्यांची ११०.७० कोटींची जंगम मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात आतापर्यंत २,०९५ कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे. २०१९ मध्ये कार्वीचा हा गैरव्यवहार उघडकीस आला होता.