मुंबई- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रुग्णांना गोवा येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी सर्व अडचणींवर सकारात्मक रितीने मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिले. यावेळी बैठकीत आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, ता. सावंतवाडी येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एमटीडीसीच्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळणेबाबत तसेच वेंगुर्ला येथे सिंधु स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळणेबाबत चर्चा करण्यात आली.