संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

महाराष्ट्रामधून शिवसेना संपणार
देशात फक्त भाजप पक्षच राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटणा – शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना ज्या ज्या वेळी विरोधी भाजप पक्षाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून त्याला निर्भीडपणे प्रत्युत्तर देणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठे विधान केले आहे. भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात राहिलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असा दावा नड्डा यांनी केल्याने देशभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा नड्डा यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल, असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार येथील 16 जिल्ह्यांतील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते. नड्डा म्हणाले की, काँग्रेस आता देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami