संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

महावितरणचे वीज भरणा केंद्र ३०,३१ जुलैलाही सुरूच राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण- थकित आणि चालू वीज देयकाचा भरणा करणे ग्राहकांना सोयीचे जावे,यासाठी जुलै अखेर शनिवारी ३० व रविवार ३१ रोजी वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी व जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवारी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे महावितरणकडून करण्यात आले आहे.
अधिकृत वीज बिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपवर वीज बिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. http://www.mahadiscom.com या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीज बिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे आदी) उपयोग करून घरबसल्या वीज बिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे. वीज बिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीज बिल भरणे सुलभ होते. अखंडित वीजसेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami