वेळापूर : माळशिरसच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे वेळापूरच्या नगरीत वैष्णवांच्या हरिनामाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी आज ठाकूरबुवाची समाधी इथे ज्ञानोबांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडले तर संत ज्ञानोबा आणि संत सोपानदेव यांच्या पालख्यांची भेटही झाली. दरम्यान, माउलींचा पालखी सोहळा वेळापूरात विसावला आहे.
संत तुकोबांची पालखी आज पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तर तुकोबारायांच्या पालखीच्या तोंडले बोंडलेमध्ये धावा झाल्या.तुकाराम महाराजांना ज्या टप्प्यावरुन विठ्ठल मंदिराचा कळस दिसला तिथून वारकरीसुद्धा धावत धावा पूर्ण करतात अशी परंपरा आहे. त्यामुळे “तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा” असं म्हणत वारकरी आता पंढरपूरकडे धावा घेत आहेत. आषाढी एकादशीजवळ येत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.