संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान !शार्लोट तलावातील गाळ काढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कर्जत – भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून उद्या मंगळवार २६ जुलैपासून माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात माथेरान शहर आणि कर्जत तालुक्यातील हजारो श्री सदस्य सहभागी होणार असून ते शहरातील शार्लोट तलावामधील गाळ काढणार असून परिसराची स्वच्छता करणार आहेत.
पावसाच्या पाण्याबरोबर जंगलातील गाळ आणि माती तसेच पालापाचोळा वाहून येऊन शार्लोट तलावाची साठवण क्षमता कमी होत आहे. या तलावातील गाळ काढल्यास माथेरानकरांना आणि पर्यटकाना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शार्लोट तलाव आणि परिसरात हजारो श्री सदस्य उद्या मंगळवार २६ जुलैपासून चार दिवस हे महास्वच्छता अभियान राबविणार आहेत. या कामासाठी माथेरान नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती प्रशासक आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.माथेरानचे माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि पालिकेचे माजी सभापती प्रसाद सावंत यांनी या प्रतिष्ठानकडे शार्लोट तलावाची स्वच्छता करण्यासाठी सहकार्य मागितले होते.त्यास होकार मिळाल्याने आता उद्यापासून ही महास्वच्छता मोहीम सुरू होणार आहे.याआधी २०१३ मध्ये याच प्रतिष्ठानमार्फत या तलावाची स्वच्छता करण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami