मुंबई – वातावरणातील बदल आणि पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील कुलाबा येथील डॉपलर रडार हे ऐन मान्सून काळात मागील सहा दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.मागील वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवली होती.गेल्या अनेक वर्षांपासून या डॉपलर रडारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हे डॉपलर रडार बंद असल्याने मुंबईतील पावसाळी परिस्थितीची माहिती मिळणे अवघड झाले आहे.डॉपलर रडार हे पाऊस ,ढगफुटी,गारपीट आणि वातावरणातील इतर बदलाची माहिती चार ते सहा तास आधी देत असते.ते आपल्या परिघातील पावसाची तीव्रता कशी असेल आणि किती मिमी पाऊस प्रति तास कोसळू शाकेल्याचा अचूक अंदाज देत असते.सध्या मुंबईत मान्सून दाखल झाला आहे पण डॉपलर रडार बंद असल्याने त्याची स्थिती काय असेल ही माहिती मिळेनाशी झाली आहे. सध्या जोगेश्वरी येथील वेरावली परिसरात्तील सी- बंद हे पावसाची माहिती पुरवताना दिसत आहे.आतापर्यत पाचवेळा हे डॉपलर रडार बंद पडल्याची माहिती आहे.२०१०,२०१७,२०१९,२०२० आणि गेल्या वर्षी २०२१ मध्येही ९ जून रोजी हे डॉपलर रडार बंद पडले होते.२०१७ मध्ये ओखी वादळामुळे ते नादुरुस्त झाले होते.तर २०२० मध्ये जून महिन्यातील निसर्ग चक्री वादळाच्या आधी ४८ तास हे रडार बंद पडले होते.दरम्यान,दे डॉपलर रडार तातडीने दुरुस्त करून पुन्हा सेवेत उपलब्ध केले जाईल अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख जयंता सरकार यांनी दिली आहे.