संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

मायक्रोसॉफ्ट कंपनीत एकाचवेळी 1800 कर्मचार्‍यांची मोठी कपात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे जगात सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. अजूनही कोरोनाची झळ उद्योगांना सहन करावी लागत आहे. अशातच जगातील अनेक मोठ्या कंपन्या टाळेबंदीची चिन्हे दाखवत आहेत आणि आर्थिक मंदीचे कारण देत कर्मचारी कपात करत आहेत.आर्थिक मंदीची ही झळ आता मोठ्या टेक कंपन्यांपर्यंत पोहोचली आहे.सत्या नडेला संचालित मायक्रोसॉफ्ट ‘पुनर्रचना’चा भाग म्हणून आपल्या जवळपास 1800 कर्मचार्‍यांना कमी केले आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टने मंगळवारी उशिरा एका निवेदनात बिझनेस टेलिव्हिजन चॅनेलला सांगितले की, सर्व कंपन्यांप्रमाणे आम्ही नियमितपणे आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यांचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार संरचनात्मक समायोजन करतो. आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करणे सुरू ठेवू आणि येत्या वर्षभरात एकूण कर्मचारी संख्या वाढवू, असे म्हटले आहे. मात्र, कंपनीतील टाळेबंदीची ही बातमी पाच वर्षांत प्रथमच समोर आली आहे,असे असले तरी मायक्रोसॉफ्टने तिसर्‍या तिमाहीत मजबूत कमाई नोंदवली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami