संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

मावळच्या कुंडमळ्यात पर्यटन बंदी असूनही पर्यटकांची मोठी गर्दी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मावळ – पर्यटन तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मावळातील पर्यटनस्थळे ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटन स्‍थळांवर जाण्यास काही दिवस बंदी आहे. तरीदेखील कुंडमळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्‍याचे पाहावयास मिळाले.

मावळतील टायगर पॉईंट, भुशी डॅम, कुंडमळा ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहे. मात्र मुसळधार पाऊस झाल्‍याने येथे पर्यटनास बंदी असूनही शेलारवाडीच्या इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळ्यात पर्यटकांची गर्दी झाली. चार दिवसांपूर्वी याच कुंडमळ्यात मित्रांसोबत आलेली एक मुलगी वाहून गेली होती. तरीही सेल्फी काढणे, पाण्यात पाय सोडून बसणे असे प्रकार इथे घडत आहेत. परंतु पर्यटकांनो आपला जीव अधिक मौल्यवान आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीवही जाऊ शकतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami