संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

मास्टर मॉल परिसरातीलइमारतीची चौकशी सुरु

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिक शहरातील मास्टर मॉलला रविवारी लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात आली. यावेळी आग विझवण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे विनापरवानगी वापर आणि विनापरवानगी इमारत उभी केल्याप्रकरणी संबंधितांना नोटीस देऊन थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून चौकशी करण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समितीचे नेमण्यात आली असून आधिकार्‍यांनी या ठिकाणी जाऊन मास्टर मॉल इमारतीची पाहणी केली. मास्टर मॉलला रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली होती तर सुमारे 30 तासांनंतर ती आग आटोक्यात आली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन अधिकार्‍यांना सूचना केल्यानंतर आणि इमारतीच्या समोरील भिंत तोडण्याचे आदेश दिल्यानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली होती. नाशिक शहरात अनेक भागात मास्टर मॉलप्रमाणे दाटीवाटीच्या क्षेत्रात इमारती उभ्या आहेत. आता मास्टर मॉलच्या घटनेवेळी अग्निशामक दलाच्या वाहनांना जाण्यासाठी देखील जागा नव्हती. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील सर्व धोकादायक, दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक इमारतींची चौकशी करण्याचे ठरवले आहे. नाशिक शहरातील दाटीवाटीच्या क्षेत्रात उभारलेल्या इमारतींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपायुक्त करुणा डहाळे, नगरचना विभागाचे संजय अग्रवाल, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा समिती समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami