संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

माहितीये…रेल्वे अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य अर्थसंकल्पात समावेश का झाला?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

देशाचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता केवळ काही दिवस उरले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पही या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा भाग असेल. मात्र तुम्हाला माहितीये का? पूर्वी रेल्वेमंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करायचे. परंतु मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही जुनी प्रथा संपवून 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्पाच्या घोषणा सर्वसाधारण अर्थसंकल्पातच करण्यास सुरुवात केली.

पूर्वीपासून सामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्पही सादर केला जात होता. मात्र 1920-21 मध्ये, एकवर्थ समितीने रेल्वे अर्थसंकल्पावर आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की, रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जावा आणि त्याच्या आर्थिक बाबी स्वतंत्रपणे पाहिल्या जातील. त्यामुळे भारताचा पहिला स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प 1924 मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता. तेव्हापासून 2016 पर्यंत ही प्रथा सुरू होती. परंतु ही अनेक दशकांची जुनी प्रथा बंद करण्याचा सल्ला नीती आयोगाने सरकारला दिला होता. मग बराच विचारमंथन केल्यानंतर सरकारने रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तुलनेत रेल्वे बजेटचा हिस्सा आता खूपच कमी असल्याने ही कल्पना व्यवहारिक होती.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षांची प्रथा रद्द करून 2017 पासून सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, यंदा 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. मग सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी देशासमोर ठेवला जाईल. त्यानंतर अधिवेशनाचा पहिला भाग ११ फेब्रुवारी रोजी संपेल आणि एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग १४ मार्चपासून सुरू होईल आणि ८ एप्रिल रोजी संपेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami