नवी दिल्ली- भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनंतर आता रुमेली धरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. तिच्या या पोस्टमधून 15 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केले आहे. धरने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रुमेली धरने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतले होते.