बंगळुरूतील सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘मीशो’ 2022च्या उत्तरार्धात किंवा 2023च्या सुरुवातीला शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीला Facebookची मूळ कंपनी Meta Platforms आणि Softback Groupच्या Vision Fund 2 द्वारे निधी दिला जातो. कंपनी लवकरच IPO आणण्याच्या तयारीत असून पुढील वर्षी जानेवारीपर्यंत इश्यूसाठी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. म्हणजेच मीशोचा आयपीओ 2023 च्या सुरुवातीला येऊ शकतो.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात मीशोने सीरिज एफ फंडिंग फेरीत 57 कोटी डॉलर जमा केले. कंपनीने हे पैसे 4.9 अब्ज वॅल्युएशनवर उभे केले आहेत. फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली मीशो यांनी हा निधी उभारला होता. दरम्यान, कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये JPMorgan Chaseचे माजी गुंतवणूक बँकर धीरेश बन्सल यांना मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.