संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

मुंबईतील सर्व कोव्हिड सेेंटर बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- कोरोनाची चौथी लाट रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. त्याचा परिणाम म्हणून मुंबई महापालिका रुग्णालयांसह जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व जम्बो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. मालाड, भायखळा, मुलुंड, एनएससीआय आणि बीकेसी येथील जम्बो कोविड केंद्रे बंद केली जातील. पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को आणि कांजूरमार्ग ही जम्बो केंद्रे बंद झाली होती. तेथील सामानाचे विघटन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबईमध्ये मार्च 2020 रोजी कोरोनाचा उद्रोक झाल्यानंतर मुंबईतील रुग्णालयातील बेड कमी पडले होते. त्यानंतर परिणामी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 10 कोविड सेंटर उभारले होते. त्यासाठी करो़ड़ो रुपए खर्च केले. या कोविड सेंटरसाठी ऑक्सीजनसह इतर वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आले होते. या सेेंटरमध्ये महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स, कर्मचारी काम करत होते. तसेच ठेकेदारीवर डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्ती केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami