संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

मुंबई एअरपोर्टजवळील 48 इमारती पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. विमानतळाच्या आजुबाजुला असलेल्या टोलेजंग 48 इमारती पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. कोर्टाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे.

मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता यशवंत शेनॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी करण्यात आली आहे. त्यात मुंबई विमानतळाजवळील उंच इमारतींमुळे निर्माण होणार्‍या धोक्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्या इमारतींचे वीज व पाणी सेवा पुर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. सुनावणीवेळी, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सांगितले की, या संदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण केले जाते. 2010 मध्ये एकूण 137 अडथळ्यांच्या इमारतींची ओळख पटली. त्यापैकी 163 प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यापैकी 48 इमारती तात्काळ पाडण्याची गरज आहे कारण त्यांच्या वतीने कोणतेही अपील दाखल करण्यात आलेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami